खरी शिवसेना कोणाची या दाव्यासंदर्भात निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेत. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली. जोपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे.
या याचिकेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटाच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने जी कारवाई सुरू केलीय, तिला स्थगिती देण्याची मागणी केली. या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर कारवाई करू शकत नाही, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्याकडून याचिकेत करण्यात आला आहे.