Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली – हेमंत टकले

Webdunia
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने गरीबांना स्वस्त दरात भोजन मिळावे यासाठी शिवथाळी योजना राबवण्य़ाचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीपासून राज्याभरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यावर भाजपाचे आमदार राम कदम यांनी ही घोषणा खोटी असल्याचे मत मांडले. त्यामुळे शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी विरोधकांना लगावला. 
 
थाळीसंदर्भातील स्वतःचा अनुभवही हेमंत टकले यांनी विशद केला. महालक्ष्मी रेसकोर्स येथे जेवणाच्या वेळेत तिथल्या कँटीनमध्ये थाळीचा आस्वाद हेमंत टकले यांनी घेतला. साठ रूपयात मिळालेल्या थाळीत उत्तम जेवण मिळाले. अशाच प्रकारचे उत्तम जेवण केवळ दहा रुपयात सरकारच्या शिवभोजन मोहीमेतून गरीबांना मिळणार आहे. यामुळे विरोधकांचे पोट दुखेलच.. पण त्यावर देखील मार्ग काढण्यात येईल, असे सांगत हेमंत टकले यांनी विरोधकांवर खोचक टीका केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: ‘अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

पुण्यातील पौडच्या नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

हिंदू तरुणाच्या घरात ५ कबरी, या धक्कादायक प्रकरणाचे वास्तव काय आहे?

डोली ऐवजी अर्थी उठली... लग्नाच्या काही तास आधीच वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SRH vs DC : आयपीएल 2025 चा 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियमवर

पुढील लेख
Show comments