Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेगावची प्रसिद्ध कचोरी आली रडारवर! FDA च्या अचानक पडलेल्या छाप्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

Shegaon Kachori
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर एफडीएचा छापा टाकण्यात आला आहे. लाखो भाविक संत नागरी शेगावमध्ये आल्यानंतर श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर प्रसिद्ध कचोरीचा आस्वाद घेतात. तसेच आता या प्रसिद्ध कचोरीवर छापा टाकण्यात आहे. तसेच या कारवाईमुळे शेगावमधील खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 ALSO READ: शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंची चिंतावाढली, मातोश्री येथे तातडीची बैठक बोलावली
मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाने संत नगरी शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर अचानक छापा टाकला. यामुळे खळबळ उडाली. तसेच हा छापा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरातील अन्नसुरक्षा मोहिमेचा भाग आहे.

माहिती समोर आली आहे की, कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणार कच्चा माल यांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात असून भेसळ किंवा दर्जाबाबत तपासणी सुरू आहे. फक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. लाखो भाविक कचोरीचा आस्वाद घेतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आला आहे. तसेच अद्याप कोणतीही भेसळ सिद्ध झालेली नाही; अहवालानंतर पुढील कारवाई होईल.
ALSO READ: महाराष्ट्रात प्रथमच गुटखा व्यापाऱ्यांवर MCOCA लागू केला जाणार; एफडीए आयुक्तांनी जारी केला मोठा आदेश
तसेच जप्त केलेल्या नमुन्यांच्या प्रयोगशाळा अहवालात जर कोणत्याही प्रकारची भेसळ किंवा निकृष्ट दर्जा आढळला, तर संबंधित प्रतिष्ठानावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. शिर्डीनंतर आता शेगावमध्ये ही कारवाई झाली आहे.
ALSO READ: सोलापूर जिल्ह्यात मुख्याध्यापकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या; २२ पानांची सुसाईड नोट आढळली
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले