Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षण : आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार

Felicitated Chief Ministers on the occasion of Ashadhi Ekadashi
Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2019 (16:25 IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील वर्षी मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करू दिली नव्हती. त्याच मराठा समाजाने यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्का मोर्तब केले आणि तत्पूर्वी राज्य सरकारने यासाठी ठोस कायदेशीर पूर्तता आणि पाठपुरावा केला. त्यामुळे न्यायालयीन कसोटीवर आरक्षण टिकले. याबद्दल मराठा समाजातून समाधान व्यक्त होत असून त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचे समाजातर्फे धन्यवाद मानण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्याची घोषणा केली. यावेळी आंदोलनास सहकार्य केलेल्या स्थानिक प्रमुख नेते मंडळींनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगून अनपट म्हणाले की, आंदोलनावेळी दाखल झालेले राज्यभरातील 13 हजारावरील युवकावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रकरणातील अडचणी दूर करण्यासाठी पावले उचलावीत अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

तुम्ही देशाला समजू शकला नाही तर परराष्ट्र धोरण कसे समजेल', बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका केली

बाबा, माझ्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला सोडू नका...निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची मुंबईत आत्महत्या

LIVE: शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 45 नवीन रुग्ण आढळले

शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 45 नवीन रुग्ण आढळले

संपूर्ण महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments