Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पावणेचार हजार गुन्हेगार दत्तक, कारण काय, वाचा

पावणेचार हजार गुन्हेगार दत्तक, कारण काय, वाचा
, गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (08:27 IST)
नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक ग्रामिण, नंदुरबार या पाच जिल्ह्यंचे सुमारे ३ हजार ४६५ सराईत गुन्हेगारांचा आढावा विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी २ हजार ७९३ पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. गुन्हेगार दत्तक योजनेची योग्य ती अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी म्हटले आहे.
 
परिक्षेत्रातील गुन्हेगारी कमी करण्यासोबत तसेच गुन्हेगारांवर वचक कायम रहावा या उद्देशाने गुन्हेगार दत्तक योजना राबवण्यात येत असते. या योजनेच्या अंतर्गत गेल्या सात वर्षांत ज्या गुन्हेगारांवर दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, खंडणी, घरफोडी, शस्त्र बाळगणे, महामार्ग लुटीचे गुन्हे नोंद आहेत अशा सर्व गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश परिक्षेत्रातील पाचही जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे.
 
या अधिक्षकांकडून अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या निगराणीखाली पोलीस स्टेशन निहाय कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक गुन्हेगार दत्तक स्वरुपात देण्यात आला आहे. या गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. याबाबतचा तपशील संबंधितांनी दर १५ दिवसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक केले असल्याचे देखील दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
जिल्हानिहाय गुन्हेगार व कर्मचारी संख्या कंसात दिली आहे. अहमदनगर – ८९५ गुन्हेगार (५९६), जळगाव- १ हजार १४४ गुन्हेगार (६७५), नाशिक – ९६७ गुन्हेगार (८२१), धुळे- ६४७ गुन्हेगार (५८९), नंदुरबार-११२ गुन्हेगार (११२).अशा प्रकारे एकूण परिक्षेत्रातील ३ हजार ७६५ गुन्हेगारांवर २ हजार ७९३ कर्मचारी लक्ष ठेवणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरात्रोत्सवात कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर बंदच