Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रथम वर्ष पदवी प्रवेश रद्द, सर्व प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश

Webdunia
शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (15:28 IST)
शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द करून सर्व प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश राज्य सरकारकडून विद्यापीठांना देण्यात आले आहेत. 
 
मराठा आरक्षणास तूर्त स्थगिती देताना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या झालेल्या प्रवेशांमध्ये बदल करू नये, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांमध्ये बदल होणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. अद्याप प्रवेश प्रक्रिया न झालेल्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेत यंदा आरक्षण लागू होणार नाही. पण राज्यातील बहुतेक विद्यापीठांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवीची प्रवेश प्रक्रिया झाली आहे, तर अकरावी, पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नोंदणी एनईएमएल पोर्टलवर होणार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले

Maharashtra Din 2025: महाराष्ट्र दिन संस्कृती आणि परंपरा जपणारा खास दिवस

शिवसेनेचे (यूबीटी) उपनेते दत्ता दळवी यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

पुणे मेट्रो लोहगाव विमानतळाशी जोडली जाईल: राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

नागपूर पोलिसांचे पाकिस्तानी नागरिकांवर बारकाईने लक्ष,अनेकांना नागरिकत्व मिळाले

पुढील लेख
Show comments