Festival Posters

मराठवाडा, नगरसाठी गंगापूर धारण समुहातून शेवटचे आवर्तन, २९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (11:50 IST)
गंगापूर धरण समूहातील दारणा, मुकणे धरणांतून मराठवाडा, अहमदनगर जिल्ह्यांसाठी शेवटचे आवर्तन सोडले असून, २९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी पोहचेल. इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये एकूण फक्त १८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. उशिरा का होईना पाटबंधारे विभाग प्रशासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  मुकणे, दारणा, वालदेवी, कडवा धरणांतून २ हजार १०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात येणार असून, दुष्काळात सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे दारणा काठच्या भागातील गावांनाही याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
 
पाणी दारणा धरणातून नदीमार्गे नांदूरमध्यमेश्वरच्या डाव्या व उजव्या कालव्यातून वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहत्याला सोडण्यात आले. पुढील पंधरा दिवस पाणी वहन मार्गावर रोज २२ तास थ्रीफेज वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. अवैध पाणीउपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, दारणा, मुकणे नदीचे पाणी आटल्याने पंधरा दिवसांपासून अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. दारणा व मुकणे धरणाचे पाणी संयुक्तरित्या औरंगाबाद, वैजापूर, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी, राहता या शहरांची तहान भागविणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरेंनी भाजपला 'बाबर जनता पार्टी' म्हटले

भ्रष्ट व्यवस्थेचा पेपर तरुणच फाडतील, TET घोटाळ्यावरून अमित ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात

बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

लडाखमध्ये बेकायदेशीर 'ऑफ-रोडिंग'वर कारवाई! पर्यटकांना २ लाख रुपयांचा दंड; तुम्ही ही चूक करू नका

नसरापूर चिमुरडी बलात्कार व खून प्रकरणी नराधम भीमराव कांबळेला पुणे न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

पुढील लेख
Show comments