Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेली चिमुरडी अशी सापडली

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (15:41 IST)
नाशिक  येथील खोले मळ्यातून पाच दिवसांपासून बेपत्ता झालेली १० वर्षांची चिमुकली पंचवटीत सुखरुप सापडली. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मुलगी सुखरुप असल्याने नागरिक व कुटुंबियांना आनंदाआश्रू अनावर झाले. गेल्या महिन्यात जेलरोड भागातून रात्रीच्या वेळी बेपत्ता झालेल्या चिमुकलीला अवघ्या सहा तासांत नागरिकांच्या सतर्कतेने व पोलीस पथकाच्या अथक प्रयत्नांनी शोधण्यात यश आले. ही घटना ताजी असतानाच २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या खोले मळ्यातून दूध आणण्यासाठी घराबाहेर आलेली १० वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली. याप्रकरणी तिच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर नाशिक शहर पोलीस, श्वान पथक, गुन्हे शाखा, उपनगर व नाशिकरोड पोलिसांची विविध पथकांनी शहराबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी तपास सुरु केला होता. रेल्वे स्थानक, झोपडपट्टी, मुलीच्या आजूबाजूची ठिकाणे पिंजून काढली होती. चार दिवस उलटूनही मुलगी सापडत नसल्याने चिंता वाढत होती.
 
शुक्रवारी (दि.४) पंचवटीतून मुलीच्या वडिलांना मुलगी असल्याची कॉलवरुन माहिती दिली. त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक विजय पगारे व पथकांनी पंचवटीत जात मुलीला ताब्यात घेतले. मुलगी सुरक्षित सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, महिला पोलिसांच्या मदतीने मुलीला वैद्यकिय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करुन तपासातून गुन्हे दाखल करण्याबाबत दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments