Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युक्रेनमधून परतलेले विद्यार्थी महाराष्ट्रातच पुढचे शिक्षण घेणार? आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणतात

Will students who have returned from Ukraine take further education in Maharashtra?
, शनिवार, 5 मार्च 2022 (15:33 IST)
युध्दग्रस्त युक्रेनमधून परतणाऱ्या वैद्यकीय विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती गोळा करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्रारंभ करण्यात आला आहे. याचबरोबर नॅशनल मेडिकल कमिशनकडे या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित करणेबाबत कोणती योजना आहे काय याबाबत विद्यापीठातर्फे विचारणा करण्यात आलेली आहे. याबाबत सुस्पष्टता व निर्देश प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांनी सांगितले.
 
मा. कुलगुरु यांनी पुढे सांगितले की, आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना. श्री. अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात युक्रेनहून परतणाÚया वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींमध्ये त्यांना कशी मदत करता येईल याबाबतीत महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घ्यावा असे सांगितले होते. यादृष्टीने विद्यापीठातर्फे www.muhs.ac.in या संकेतस्थळावर अर्ज देण्यात आला आहे. या अर्जाव्दारे विद्यार्थ्यांनी योग्य माहिती भरुन पाठवायची आहे.त्या पुढे म्हणाल्या की, देशातील सर्व वैद्यकीय विद्याशाखांचे प्रवेश ‘नीट’ प्रवेश पध्दतीव्दारे गुणवत्ता आधारीत होत असल्याने युध्दग्रस्त युक्रेनमधील विद्यार्थ्यांना येथील महाविद्यालयात सरळ प्रवेश देता येणे शक्य नाही. मात्र मानवतावादी दृष्टीकोनातून हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तिथे गेले असल्याने त्यांची विशिष्ट आकांक्षा लक्षात घेऊन त्यांच्या तेथील शिक्षणाबाबत विश्वासार्ह मूल्यांकन परीक्षा आयोजित करता येणे अशा सर्व बाबींचा विचार करण्यासाठी वस्तुनिष्ठ माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या देशांतर्गत आरोग्य शिक्षणाच्या दर्जासाठी कोणतीही मानके कमी केली जाणार नाहीत मात्र यात सर्वच भागधारकांच्या सूचना, निर्देश यांचा अभ्यास करुन निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, यात विद्यार्थ्यांनी त्यांचे वैयक्तीक व शैक्षणिक तपशील भरुन ते ई-मेलव्दारे eligibility@muhs.ac.in या ई-मेलवर पी.डी.एफ. स्वरुपात देण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राऊत, खडसे यांचे फोन टॅप, रश्मी शुक्लावर गुन्हा दाखल