Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेड मध्ये पालक मंत्री गिरीश महाजनांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

girish mahajan
, रविवार, 17 सप्टेंबर 2023 (12:31 IST)
मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी उपोषणासाठी बसले आहे. अद्याप मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांना सर्व पक्ष आंदोलन मागे घेण्यासाठी समजूत घालत आहे. सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाज राज्यसरकारच्या विरोधात आक्रमक आहे. आज नांदेड मध्ये नांदेडचे पालक मंत्री गिरीश महाजनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. 

पालक मंत्री गिरीश महाजन हे आज नांदेड मध्ये मराठा मुक्तिसंग्रामदिनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी दाखल झाले  असता सकल मराठा समाज कडून त्यांच्या ताफ्या समोर घोषणाबाजी केली. 
 
अद्याप मराठा समाजाला आरक्षण देण्या बाबत अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठा समाज सरकारवर नाराज आहे.मराठवाडा मुक्ती संग्रामला 75 वर्षे पूर्ण झाली असता  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मंत्र्याऐवजी प्रशासनाने ध्वजारोहण करण्याची मागणी मराठासमाज कडून करण्यात आली असून कोणत्याही मंत्र्याला ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. 

नांदेडमध्ये पालक मंत्री गिरीश महाजन आलेले असता आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. या वेळी आंदोलकांनी चलेजाव च्या घोषणा केल्या.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना ताब्यात घेतले.  
 
Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छ. संभाजीनगर: आदर्श पतसंस्थेची प्रॉपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे देणार- एकनाथ शिंदे