Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा सुनावली कोठडी; सातारा सत्र न्यायालयनं आता तब्बल...

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2022 (21:30 IST)
गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात वकिल गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील (Jayashri Patil) यांना देखील अटक होण्याची शक्यता होती, मात्र त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहे.
 
मराठा आरक्षण प्रकरणात माध्यमांशी बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सदावर्तेंवर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणात सातारा पोलिसांनी त्यांना अर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेतलं होतं. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अर्थर रोड तुरुंगातून सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
 
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण; सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांना दिलासा
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोल्हापुर, बीड, पुणे, अकोला अशा अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. साताऱ्यानंतर आता अकोला पोलिसांनी देखील सदावर्तेंना ताब्यात घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. त्यामुळे आता त्यांना अकोला पोलीस ताब्यात घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments