Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

विजेच्या कडकडाटासह मुंबईसह ठाणे, पालघर येथेही जोरदार पाऊस

विजेच्या कडकडाटासह मुंबईसह ठाणे, पालघर येथेही जोरदार पाऊस
, गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (08:58 IST)
विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर येथेही जोरदार पाऊस सुरु झाला . नोकरदार कामावरुन घरी जाण्याची वेळ असल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली होती . मात्र पुढे हवामान खात्याने पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल होती. तसंच गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
मुंबईत काल  सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुपारी ४ वाजल्यानंतर अचानक ढग आले आणि पावसाला जबर  सुरुवात झाली. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही तुफान पाऊस पडत आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
 
मुंबई शहरात सोमवारी रात्री पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली होती. तर, मुंबईत उपनगरांत तुरळक सरी बरसल्या होत्या. मुंबईतील काही भागात मंगळवारी सकाळीही पावसाचा मुक्काम होता.
 
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. कडक उन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. कुलाबा, सीएसएमटी, भायखळा, मलबार हिल या भागात मुसळधार पाऊस पडला. या भागात १० मि.मी. ते ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात तुरळक सरी बरसल्या. ५ मि.मी. ते १५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सायरस मिस्त्री कार अपघातः घटनास्थळी पोहचले विशेष पथक, , कळणार अचूक कारण