Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण.......

मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण.......
“मी डरणारा नाही तर मी लढणारा आहे हे लक्षात असूदेत. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण मला खोटं पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच्या मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न केला. २०१४ मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केलाच होता. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचं अंतरंग भगवंच आहे” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ते मुंबईत शिवसेनेचा वचनपुर्ती सोहळ्यात बोलत होते.  
 
”आज माझा सत्कार करण्यात आला. मी मनापासून सांगतो मी नवीन जबाबादारी घेतल्यापासून एकही सत्कार स्वीकराला नव्हता. पण आजचा सत्कार मी स्वीकारला. कारण हा माझा सत्कार नाही. हा सत्कार तुमचा आहे. मी तुमचा कुटुंबप्रमुख आणि सेनापती आहे. मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल त्या जबाबदारीपासून मी कधीही पळ काढला नाही आणि काढणार नाही. ”
 
” तुमच्या मनातही माझ्याबद्दल काय भावना असती? शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटं बोलतोय? हे कदापि होणे नाही. प्राण गेला तरी चालेल तरीही मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही म्हणूनच हा एक वेगळा मार्ग मी स्वीकारला. इतकी वर्षे आपण ज्यांच्यावर टीका करत होतो, जे आपले विरोधक होते त्यांचा हात हाती घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणाने केलं. चोरुनमारुन केलं नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की हा भगवा आम्ही खाली ठेवला. ना आमचा रंग आम्ही बदला ना अंतरंग. आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का?'