Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रत्नागिरीत थंडीचा कडाका वाढणार आंबा फळ उशिरा येण्याची शक्यता

Webdunia
मंगळवार, 17 जानेवारी 2023 (08:37 IST)
उत्तर भारतात तापमानाने किमान पातळी गाठल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आह़े रत्नागिरी जिह्यात मागील काही दिवसांपासून पारा चांगलाच घसरला आह़े पुढील 48 तासात जिह्यात थंडीची लाट वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आह़े तापमान आणखी घसरल्यास आंबा, काजू फळवाढीवर परिणाम होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आह़े
 
रत्नागिरी जिह्यात गेल्या 3 ते 4 दिवसात थंडीमुळे हुडहुडी वाढली आह़े. थंडीचे प्रमुख कारण म्हणजे वायव्य भागातून म्हणजे राजस्थानच्या आसपासच्या भागातून आपल्याकडे सध्या वारे येत आहेत़ हे वारे ईशान्य पूर्वेकडे जात आहेत़ महाराष्ट्रावर आल्यावर हे वारे चक्राकार पद्धतीने वळत आहेत़ यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट जाणवू लागली आह़े मुंबईमध्येही पारा 16 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आला आह़े तसेच पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, नंदुरबार, संभाजीनगर येथे तर पारा 5 ते 6 डिग्रीपर्यंत खाली आला आह़े  त्यामुळे थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आह़े याचा परिणाम शेतीवरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े कोकणचा विचार करता उशिरा आलेल्या थंडीमुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े तसेच फळवाढीवर देखील परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आह़े
 
आंबा फळ उशिरा येण्याची शक्यता
मागील काही वर्षापासून बदलत्या हवामानामुळे हापूस आंबा संकटात सापडला आह़े कधी थंडीची लाट, अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट यामुळे आंबा फळाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आह़े यावर्षी आंबा, काजू बागायतदार चांगल्या उत्पन्नाची आस लावून बसले होत़े मात्र डिसेंबर महिन्यात अपेक्षित असलेली थंडी न जाणवल्याने झाडे पुरेशी मोहरून आली नाहीत. आता उशिरा आलेल्या थंडीमुळे आंबा फळ उशिरा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े.
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments