Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

“हे काही रामराज्य आहे का?,” खासदार संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

“हे काही रामराज्य आहे का?,” खासदार संजय राऊत मोदी सरकारवर संतापले
, मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:16 IST)
लखीमपूर खेरी इथल्या घटनेबद्दल सध्या जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. तसंच माफीची मागणीही त्यांनी केली आहे. प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्याचाही त्यांनी निषेध केला आहे.
 
यावेळी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, प्रियांका गांधी यांच्याशी तुमचं राजकीय वैर असू शकतं, काँग्रेसशी असू शकतं, पण त्यांचा गुन्हा काय आहे की कोणत्याही वॉरंटशिवाय तिथे ताब्यात घेतलं? त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते. लखीमपूर खेरी इथं झालेल्या संघर्षाबद्दल बोलताना राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे काही रामराज्य आहे का ? तुम्ही माफी मागत आहात का ? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मगितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. पण शेतकरी, जनता लढत राहतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आगामी सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार; भाजपाच्या बैठकीत आवाहन