Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jalgaon : ईडी कडून जळगावातील राजमल लखीचंद समूहावर छापे

Webdunia
रविवार, 20 ऑगस्ट 2023 (13:36 IST)
Jalgaon RL Jwellers Raid : जळगावातील राजमल लखीचंद हे नावाजलेले समूह आहे. या समूहाने एसबीआय बँकेकडून तब्बल 525 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होत. या कर्जाप्रकरणी ईडी कडून चौकशी केली जात असून ईडी कडून 90 लाख रोख रुपये आणि सोनं सील केलं आहे. या समूहाच्या आर्थिक दस्तावेज आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त केली आहे. ईडी ने 17 ऑगस्ट रोजी जळगाव, ठाणे आणि नाशिकच्या आर एल ज्वेलर्स च्या 13ठिकाणावर छापेमारी केली आहे. 
 
ईडी ने कर्जाच्या फसवणूक प्रकरणी आर एल ज्वेलर्स प्रा.लि. आर एल गोल्ड प्रा. लि. आणि मनराज प्रा. लि. आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवाणी , पुष्पा देवी,नीतिका मनीष जैन, आणि मनीष ईश्वरलाल जैन लालवाणी यांच्या कडे छापेमारी केली आहे.  
जळगावातील प्रमुख सोनेचे व्यायसायिक आर एल ज्वेलर्स या समुहा कडून एसबीआय कडून तब्बल 525 कोटी रुपयांचे कर्ज घेतले गेले. बॅंकेने या समुहा कडे थकीत कर्ज असल्यामुळे दावे सुरु केले. आणि थकीत कर्ज फेडले नाही त्यामुळे बँकेने या समूहाच्या विरीधात दिल्ली सीबीआय कडे तक्रार केली. आणि गुन्हा दाखल केला. 
 
या प्रकरणी ईडीने गुरुवारी या समूहाच्या 13 ठिकाणी छापेमारी करून ईडीच्या 25 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून  तपासणीत 1.11 कोटी रोख रक्कम, आर्थिक दस्तऐवज, सोनं,विविध कागदपत्रे, 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोनं, आणि हिऱ्याचे दागिने, जप्त करण्यात आले असून हे सर्व जळगावच्या एसबीआयच्या मुख्य शाखेत जमा करणार आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली.  
 
 राजमल लखीचंद समुहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 525 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान या थकीत कर्जाप्रकरणी बँकेनं आणि आर. एल. समूहानं परस्परविरोधी दावे केल्यानं वाद सुरुय. स्टेट बँक ऑफ इंडियानं दिल्ली सीबीआयकडं तक्रार केली होती. त्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून आर. एल. समुहाची चौकशी केली जातेय. या प्रकरणी राजमल लखीचंद समुहाचे संचालक ईश्वरलाल जैन , मनीष जैन यांचे जबाब नोंदवून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. 
 












Edited by - Priya Dixit 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

भारतात कोविडचे २५७ रुग्ण आढळले

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

LIVE: नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्रात नवीन गाडी खरेदी करणे झाले कठीण, राज्य सरकारने बनवला नवा नियम

LSG vs SRH: सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला

पुढील लेख
Show comments