Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र पुरोगामी नाही,‘सोवळे मोडले’ म्हणून फसवणुकीचा गुन्हा

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (16:51 IST)

देशात आणि राज्यात इतके सारे प्रश्न पडले असतांना आपल्या नागरिकांचे काहीतरी भलतेच सुरु आहे. पुण्यात तर महाराष्ट्राला लाजवले असा प्रकार समोर आला आहे.  घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे कोणी इतर माणसाने केले असते तर ठीक मात्र उच्च शिक्षित हवामान विभागाच्या माजी संचालिका असलेल्या डॉ. मेधा खोले यांनी असा फिर्याद देत दबाव आणून गुन्हा नोंदवला आहे.

काय आहे हे प्रकरण 

डॉ.  खोले यांच्या घरी दरवर्षी गौरी गणपती असतात तर अनेक पारंपारिक असे  श्राद्ध विधीही केले जातात. या सर्व कामांसाठी ‘सोवळ्यातील’ स्वयंपाक करणारी अर्थात फक्त आणि फक्त  ब्राह्मण  सुवासिनी असलेली ब्राह्मण स्त्री हवी अशी त्यांची मागणी होती. या कामाकरिता त्यांना एकाने  निर्मला कुलकर्णी या बाई सुचवल्या होत्या. कार्यक्रमाचे स्वयंपाक करते असे सांगितले होते. तिच्या माहितीवरुन खोले यांनी प्रत्यक्ष धायरी येथील तिच्या घरी जाऊन चौकशी करून त्या ब्राह्मण आहेत की नाही याची खात्री केली. तिच्या कडून अनेक प्रकारे कामे करवून घेतले होते. मात्र अचानक त्यांना कळले की या महिला ब्राम्हण नसून मराठा आहेत. त्यावेळी चिडलेल्या खोले यांनी यादव बाईला मारहाण करत पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना गुन्हा नोंदवला आहे. तर यादव यांनीही ही फसवणूक आणि त्यांचे पैसे बुडवले अशी तक्रार दिली आहे. मात्र पुरोगामी असलेल्या राज्यात असे झाल्याने सावरकर,आंबेडकर आणि फुले याच राज्यात जन्मले होते का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

प्रेम संबंधाच्या करणावरून तरुणाचा निर्घृण खून, पुण्यातील घटना

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments