Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक, शिवसेना नरमली,काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होणार

Webdunia
शनिवार, 19 मार्च 2022 (08:26 IST)
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीत शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे. हा मतदारसंघात  महाविकास आघाडी सरकारकडे असल्याने शिवसेनेने नरमाईची धोरण स्विकारले आहे. या जागेवर शिवसेनेने आधी दावा केला होता. मात्र, आघाडी सरकार असल्याने आता येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढविणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होणार आहे.
 
दरम्यान, एकीकडे काँग्रेसचे नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत असल्याच सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. शिवशक्तीकडून करूणा शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने यापूर्वीच सत्यजित कदम यांचे नाव घोषित केले आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक बहुरंगी होणार असंच सध्याचे चित्र असले तरी काँग्रेस आणि भाजपमध्ये खरी लढत रंगणार आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव  यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुपुष्यामृतयोग 2024 : पुष्य नक्षत्रावर सुख-समृद्धीसाठी या गोष्टी अवश्य खरेदी करा

दिवाळीच्या इतिहासाशी निगडित ही माहिती तुमच्यासाठी नवी असू शकते

Diwali Muhurat Trading History दिवाळी मुहूर्त व्यापार कधी सुरू झाला?

Hair Care हे तेल केसांना लावल्याने होतील खूप फायदे

लवकर उठण्याचे हे 5 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुणे पोलिसांनी कारमधून जप्त केले पाच कोटी रुपये

बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

रायगडमध्ये होम स्टेमध्ये खोली न दिल्याने पर्यटकांनी महिलेला स्कॉर्पिओने चिरडले

'मेहनती नेते, उत्कृष्ट प्रशासक',पंतप्रधान मोदींनी अमित शहा यांना अश्या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्रातील नांदेड भूकंपाने हादरले, रिश्टर स्केलवर 3.8 तीव्रता

पुढील लेख
Show comments