Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप आमदारांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर, फडणवीसांनी दिले कारवाईचे निर्देश

Lawrence Bishnoi banner BJP program
, शनिवार, 17 मे 2025 (11:00 IST)
Nashik News : नाशिकच्या सिडकोत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे बॅनर दिसल्यामुळे राजकारण  चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. हे बॅनर एका अल्पवयीन मुलाने लावल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 नाशिकच्या सिडको भागात हिंदू विराटसभेचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या निषेधार्थ एक सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा एक मोठा बॅनर दिसला. बॅनर दिसतातच गोंधळ उडाला. 
ALSO READ: पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा यांनी माफी मागावी, भाजप नेत्यांच्या टीकेवर हर्षवर्धन सपकाळ संतापले
या वरून विरोधकांनी टीका केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी गांभीर्य घेत कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी पडळकरांशी या बाबत चर्चा केली असून पोलिसांना सर्व माहिती देण्यास सांगितले आहे.
  ALSO READ: छत्रपती संभाजीनगर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
कोणत्याही गुंडांचे गौरव करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. असे फडणवीस म्हणाले. त्यांनी पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विंध्यवासिनी ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई, 81.88 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त