उद्धव ठाकरे पंतप्रधान होण्याच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले इंडिया आघाडीत सर्व पक्षांच्या प्रमुखांचा समावेश आहे. तेच पुढील पंतप्रधानांचे नाव ठरवतील. उद्धव ठाकरे या साठी पर्याय का असू शकत नाही? ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इंडिया आघाडीत अनेक चेहरे आहे उद्धव ठाकरे त्यापैकी एक आहे.
ते म्हणाले की देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी आमच्यावर आल्यावर आम्ही त्याचे स्वागत करू. काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे.
इतर पक्षही आपापल्या राज्यात निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याकडे नेतेही आहेत. अशा स्थितीत नेतृत्व कोण करणार हा प्रश्नच नाही, तर हुकूमशाहीला पराभूत व्हावेच लागणार.मात्र भाजप मध्ये एकच चेहरा आहे. तोच गेल्या 10 वर्षांपासून चालत आहे. आता या चेहऱ्याला लोक स्वीकारणार नाही. पीएम मोदी आणि त्यांचा पक्ष या निवडणुकीत हरणार आहे.
नाना पटोले जे काही बोलले त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ही लढाई पंतप्रधानांची नाही. हे काँग्रेस पक्षाला समजत नाही. राहुल गांधींना जर पंतप्रधान व्हायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. ते देशाचे नेते आहे. राहुल गांधींशी आमचे चांगले संबंध आहेत.पण पंतप्रधानांसाठी इतर चेहरे देखील आहे. ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे या शर्यतीत आहेत. आमच्या पक्षाच्या नेत्याचे नाव कोणी घेत असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे.एवढी मिरची लागायचं कारण नाही.