राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी देखील अजूनही अपेक्षित असा पाऊस राज्यात बघायला मिळत नाही. शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
दहा जूनला राज्यात दाखल झालेला मान्सून आता संपूर्ण राज्यात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.
मात्र मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने अजूनही राज्यात या मान्सून काळात जोरदार पाऊस कुठेच बघायला मिळाला नाही. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे लवकरच राज्यात जोरदार पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत.
या दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी छाप सोडणार्या पंजाबराव डख साहेबांचा नवीनतम अंदाज देखील आता जाहीर करण्यात आला आहे. या नवीनतम अंदाजात पंजाबराव डख साहेबांनी जुलै महिन्यापर्यंत मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब रावांच्या नवीनतम अंदाजाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बात आहे.
काय म्हणतायत पंजाबराव डख
परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार, राज्यात कालपासून मान्सूनच्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. कालपासून सुरू झालेला मान्सूनचा पाऊस जवळपास दोन जुलै पर्यंत कायम राहणार आहे. दोन जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे.
म्हणजेच दोन जुलै पर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची नोंद केली जाणार आहे. यामुळे निश्चितच पावसाची वाट पाहणाऱ्या आणि पेरणीसाठी खोळंबलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. पंजाबराव डख यांच्या मते, 23 जून पासून राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे.
23 जून ते 27 जून या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव यांनी वर्तवली आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला मान्सूनचा पाऊस पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून शेतकरी बांधव आता खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामासाठी पुन्हा एकदा तयारी करू लागला आहे. दरम्यान काही ठिकाणी शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे देखील उरकली आहेत. अशा भागातील शेतकरी बांधव आता मान्सूनच्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.