Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण

Mobile picture of a minor girl taking a bath in Ahmednagar
, बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (08:54 IST)
बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे तरूणाने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. मोबाईलमध्ये चित्रिकरण करणारा तरूण अजरूद्दीन अरिफ बेग (रा. संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी, माणकेश्‍वरगल्ली, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अहमदनगर शहरात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.सुमारे एक महिन्यापूर्वी मी घरातील बाथरूममध्ये अंघोळ करत असताना खिडकीतून कशाचा तरी आवाज आल्याने मी खिडकीकडे पाहिले तेव्हा अजरूद्दीन बेग हा खिडकीमध्ये ती चा मोबाईल ठेवून मी अंघोळ करत असल्याचे चित्रिकरण करत होता.त्याचा हा प्रकार पाहून मी त्याला ओरडले असता तो त्याचा मोबाईल फोन घेवुन पळून गेला, असे पीडित अल्पवयीन मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान झालेला प्रकार आई-वडिलांना सांगितला असता वडिलांनी मला व माझ्या आईला शांत राहण्यास सांगितले. यानंतर आई-वडिलांमध्ये वाद झाला.
 
आम्ही मामाकडे राहण्यासाठी गेलो. वडिलांच्या भितीपोटी फिर्याद दिली नव्हती, असेही पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
 
आरोपी अजरूद्दीन बेगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई