मराठी भाषा दिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मुंबई या दोन्हीचं नातं सांगताना याबाबतची अनेक वक्तव्य केली.
यावेळी त्यांनी मराठी भाषेचा गौरव करताना "हा दिवस वर्षातून एकदाच असता कामा नये. रोज या भाषेचा गौरव कसा वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे."
मराठी भाषा आणि मुंबईबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "ज्यावेळी मराठी माणसाला न्याय मिळत नव्हता त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या मनगटातील ताकद दाखवून दिली. तसंच सुधीर जोशींनी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसासाठी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे ही मुंबई अशीच मिळाली नसून रक्त सांडवून घ्यावी लागली. तर या मुंबईतून सर्वकाही मिळत आहे तिथे मराठी पाट्याच हव्या.''