Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सार्वजनिक शौचालय खचले, दोघांचा मृत्यू

mumbai public toilet
, शनिवार, 28 एप्रिल 2018 (17:15 IST)
मुंबईतील भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतील संपूर्ण  सार्वजनिक शौचालय खचले. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला आहे. ज्या ठिकाणी ही शौचालये होती तिथे मोठा खड्डा पडला आहे. सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली 2 महिला आणि 2 पुरुष अडकले होते. अखेर अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाच्या जवानांनी दोघांचे मतदेह बाहेर काढले आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तू, तू है वही दिल ने जिसे अपना कहा...म्हणत मोदींचे स्वागत