Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास- देवेंद्र फडणवीस

Webdunia
मंगळवार, 16 मे 2023 (08:52 IST)
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पहिल्या लढाईत भाजप-शिवसेनेचा भगवा झेंडा पुणे महापालिकेवर फडकेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास महापालिका निवडणूक होण्याचे संकेतही दिले.
 
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, दिलीप कांबळे, राजेश पांडे आदी या वेळी उपस्थित होते.
 
फडणवीस यांनी म्हटलं, “महावसुली सरकार, स्थगिती सरकार घालवून आता राज्यात गतिशील सरकार आहे. कोट्यवधीच्या योजना पुन्हा पुण्यात सुरू झाल्या आहेत. पुणे भाजपचा गड आहे. गिरीश बापट, मुक्ता टिळक यांची पोकळी जाणवेल. पण गिरीश बापट यांनी संघर्ष करून कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आजचा संघर्ष वेगळा आहे. संघटना ही भाजपची ताकद आहे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.
 
आता पहिली लढाई महापालिकेची येईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये किंवा न्यायालय सांगेल तेव्हा येईल. पहिली लढाई भाजप-शिवसेना जिंकणार, पुणे महापालिकेवर भगवा फडकणार.”लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
 
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नीरज चोप्रा लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवणारी माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस शिवसेना कडून जाहीर

LIVE: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

पुढील लेख
Show comments