Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नात्याचा खून : नांदेडच्या माजी सैनिकाचा मुलगा -सून आणि नातवाने खून केला

Murder of a relative: Son-in-law and grandson of a former soldier of Nanded murdered नात्याचा खून : नांदेडच्या माजी सैनिकाचा मुलगा -सून आणि नातवाने खून केला Maharashtra news Regional Marathi News  In Webdunia Marathi
, रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (14:58 IST)
नात्याला काळिमा लावणारी घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात घडली आहे. येथे लहुजी नगर येथे राहणाऱ्या माजी सैनिक नारायणराव साबळे यांना पोटच्या मुलाने मारहाण केली या मारहाणीत त्यांना जबर मार लागून त्यांचे निधन झाले. साबळे यांनी 1965 ते 1971 काळात झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सक्रियरित्या भाग घेतला होता. 
प्रकरण असे आहे की सेवानिवृत्त माजी सैनिक नारायण साबळे हे नांदेडच्या अर्धापूर शहरात लहुजी नगर येथे वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा विजय साबळे(45) याचे वडिलांशी मतभेद झाले त्या रागाच्या भरात येऊन त्याने वडिलांना मारहाण केली.या मारहाणीत त्यांच्या मुलाला त्याच्या पत्नी म्हणजे साबळे यांची सून आणि नातवाने मदत केली. विजय यांनी आपल्या जन्मदाता  पिताला दगड लाथाबुक्काने मारहाण केली. या मारहाणीत नारायण साबळे यांच्या डोक्याला  दगडाचा जबर मार लागला आणि साबळे हे गंभीररित्या जखमी झाले. वडिलांना मारहाणी केली हे समजतातच नारायण साबळे यांचा धाकटा मुलगा दिलीप साबळे आणि सून गयाबाई यांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
धाकटा मुलाने वडिलांचा खून केल्याचा आरोप विजय साबळे वर करत त्याच्या आणि त्याच्या पत्नी आणि मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. सेवानिवृत्त माजी सैनिक नारायण साबळे यांच्या खुनाच्या प्रकरणी दिलीप नारायण साबळे यांच्या फ्र्यादी वरून आरोपी विजय नारायण साबळे, विजय यांची पत्नी सौ. साबळे आणि मुलगा शुभम साबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल देशमुखांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी