पेट्रोल भरताना पेट्रोल पंपावर बोलू नये असे सांगितले जाते आणि तशी सूचना लिहून ठेवली जाते. पेट्रोल पंपावर फोनवर बोलणे हे जीवघेणे असू शकते.
बऱ्याचदा पेट्रोल पंपावरील कर्मचारी ग्राहकांना पेट्रोलपंपावर फोनवर बोलू नका असे सांगतात तरीही काही बेजवाबदार लोक ऐकत नाही नागपुरातून बुटीबोरीच्या एका पेट्रोलपंपावरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुचाकीत पेट्रोल भरवत आहे. दुचाकीस्वाराचा फोन वाजतो तो फोन उचलतातच अचानक मोबाईल पेट घेतो.मागील बसलेला व्यक्ती तातडीने दुचाकी सोडून बाजूला होतो आणि पेट्रोलपंपावरील कर्मचारी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवतात. सुदैवाने कोणताही मोठा अनर्थ टळला.एक लहानशी चूक किती मोठ संकट ओढावू शकते हे या व्हिडीओतून दिसून येत आहे.
सुदैवाने उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणल अन् मोठी दुर्घटना टळली. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.