Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नाशिकचा बहुचर्चित बाफणा खून खटला ; 2 आरोपींना शिक्षा

jail
, शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (20:50 IST)
नाशिक : साडेनऊ वर्षांपूर्वी एक कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जवळपास साडेनऊ वर्षाच्या काळात सुरु असलेल्या गुन्ह्याचा खटला अंतिम टप्यात येऊन काही दिवसांपूर्वीच त्यावर सुनावणी झाली होती. या गुन्ह्यातील दोघांना दोषी ठरविण्यात आलं होतं तर तिघा संशयितांची न्यायालयाने मुक्तता केली होती. दरम्यान दोषी ठरविण्यात आलेल्या दोघांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
 
8 जून 2013 रोजी मयत बिपीन गुलाबचंद बाफणा (22, रा. वसंतविहार ओझर,ता. निफाड जिल्हा नाशिक) हा डान्स क्लासला जाऊन येतो, असे सांगून गेला होता. त्यानंतर त्याचे अपहरण करीत अज्ञात व्यक्तीने बिपिनच्या मोबाईलवरून गुलाबचंद बाफना यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी बिपीन बाफणा याची निर्घृण हत्या केल्याची ही घटना आहे.
 
पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून या हत्याकांडातील संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अपहरण करून हत्या करण्याबाबत दाखल असलेला खटला न्यायालयात साडेनऊ वर्ष चालला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. मंगळवार (दि. 13/12/2022) रोजी नाशिकच्या न्यायालयात संशयित असलेले चेतन यशवंत पगारे, अमन प्रकट सिंग जट यांना न्यायालयाने दोषी ठरविले असून अक्षय सुळे, संजय पवार, पम्मी चौधरी यांना दोष मुक्त करण्यात आले आहे. यातील दोघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 
जून 2013 घडलेल्या बिपिन बाफणा हे हत्याकांड नाशिकचा थरकाप उडवणारे होते. एका व्यापाऱ्याच्या मुलाचं खंडणीसाठी पंचवटीतून अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्याला ठार मारण्यात आलं आणि खुनाचे पुरावे देखील नष्ट केल्याच्या या खळबळजळत घटनेने संपूर्ण नाशिक हादरलं होतं. खंडणी, अपहरण आणि खून या प्रकरणात आतापर्यंत ३५ साक्षीदार तपासले गेले आहेत.
 
जून 2013 …
 
मूळ ओझर मध्ये राहणारे गुलाबचंद बाफणा यांच्याकडे संशयित आरोपींनी त्याच्या मुलाचे अपहरण करत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. 8 जून 2013 साली संशयितांनी त्यांचा मुलगा बिपिन याचे पंचवटी, दिंडोरी फाटा येथून अपहरण केले होते. 9 जून2013 रोजी फोनवर शिवीगाळ करत ‘तुझ्या मुलाची हालत खराब करू’ अशी धमकी दिली. त्यानंतर14 जून 2013 रोजी एका शेतात बिपीन बाफणा याचा मृतदेह आढळून आला होता. तेव्हापासून हा तपास सुरु होता.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sydney Thunder vs Adelaide Strikers Score card BBL 2022: टी-20 क्रिकेटमध्ये पानिपत