Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाविकास आघाडीला नाशिक, परभणीमध्ये खिंडार; नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Webdunia
शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (14:33 IST)
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाने महाविकास आघाडीला  मोठे खिंडार पाडले आहे. कारण, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या ५० पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. तसेच, परभणीमध्ये महाविकास आघाडीचे तब्बल ३० नगरसेवक शिंदे गटामध्ये जाणार आहेत. अशामध्ये आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
 
विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "विरोधकांना आरोप करत राहूद्या, मी काम करत राहीन. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार चालत असताना अनेक लोकं पक्षाशी जोडली जात आहेत. त्यामुळे या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. राज्यात आपले सरकार आल्यापासून काम करणारे, शेतकरी, कामगार अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे." यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार शिवाजीराव जाधव, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ठाकरे गटाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील तरुणांकडून भाजपने रोजगार हिसकावला-आदित्य ठाकरे

भयानक क्रूरता : कुत्र्याच्या पिल्लांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले

योगी आदित्यनाथ आज लखनौमध्ये गोमती पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करणार

विधानसभा निवडणूक : अमित शाह झारखंड दौरा करणार

मुंबईत दोन कोटींची रोकड सापडल्यानंतर निवडणूक आयोगाने दिले कडक कारवाईचे आदेश

पुढील लेख
Show comments