Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागणार -राजेश टोपे

Night curfew will be imposed in the state again - Rajesh Tope Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
, रविवार, 29 ऑगस्ट 2021 (18:20 IST)
केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता सणासुदीचा काळ जवळ येता आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे त्यामुळे केंद्राने राज्यात रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता सणासुदीचा काळ जवळ येता आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे त्यामुळे रात्रीची संचारबंदी लावण्याची शक्यता वर्तवली आहे.या बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठाकरे घेतील अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना मध्ये माध्यमाशी बोलताना दिली.
 
सध्या केरळ मध्ये ओणम सणामुळे कोरोना चे प्रकरण वाढले आहे.कोरोनाने पुन्हा  आपले डोकं वर काढले आहे. केरळ मध्ये सध्या केरळच्या मुख्यमंत्रानी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजे पर्यंत संचार बंदी लागू केली आहे.सध्या केरळ मध्ये कोरोनाचे प्रकरण जास्त वाढले आहे.त्याच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर आहे.या मुळे केंद्र सरकारची चिंता वाढत आहे.
 
याला विचारात घेता केंद्र सरकार ने या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून रात्रीची संचारबंदी चा विचार करण्यास सांगितले होते.केरळ मध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता