Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आरोग्यदूत नव्हे हा तर 'गुटखा किंग, राज्यभरात अवैध गुटख्याच नेटवर्क

arrest
, गुरूवार, 29 जून 2023 (20:55 IST)
नाशिक : स्वतःला आरोग्यदूत अशी ओळख करून देणारा तुषार जगताप हा गुटखा माफिया निघाल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.दरम्यान तुषार जगताप याला इगतपुरी न्यायालयात हजर केल्यावर सरकारी वकीलांनी त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने तुषार जगतापला न्यायालयीन कोठडी सुनावली. तुषार जगतापच्या वकीलांनी लगेच जामीन अर्ज केल्याने न्यायालयाने १५ हजार रुपयांत जामीन मंजूर केला आहे. 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी पोलिसांच्या पथकाने मुंबईकडे जाणारे गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्त केल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपी राज किशनकुमार भाटिया (३८, रा. जयपूर, राज्य राजस्थान)  यास (दि.२३ जून) जयपूर येथून अटक करण्यात आली होती. राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सुत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करत होता.
 
नाशिक ग्रामीणमध्ये दाखल गुटखा तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या ०२ ते ०३ वर्षांपासून फरार होता. तपासा दरम्यान तो सन २०२१ पासून नाशिक येथील तुषार जगताप याच्या संपर्कात होता व त्याच्या मदतीने महाराष्ट्रातील अवैध गुटख्याचे नेटवर्क चालवत होता. यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करून तुषार कैलास जगताप (३६,रा. त्रिमुर्ती नगर,नाशिक) यास पोलिसांनी अटक केली. 
 
तुषार जगताप हा त्याचे गुटखा तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्ह्यात गुटख्याची मोठया प्रमाणावर तस्करी करत होता. जिल्ह्यातील अवैध गुटखा नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके कारवाई करत असून राज भाटिया याचा नाशिक शहरातील हस्तक जगताप याच्या अटकेमुळे गुटखा तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे. 
 
करोना काळात रुग्णांना खाटा, औषध, प्राणवायूसाठा उपलब्ध करून देत असल्याचा आभास त्याने निर्माण केला होता. यामुळे आरोग्य दूत म्हणून तो ओळखला जाऊ लागला होता. २०१९ मध्ये मराठा आर्थिक विकास महामंडळाचा संचालक म्हणूनही त्याने काम पाहिले. मराठा क्रांती मोर्चा नियोजनातही तुषारची भूमिका होती.    
 
गुटखा किंग असलेला तुषार जगताप राजकीय मंडळींसमवेत वावरत होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस दलातील अन्य अधिकाऱ्यांसोबत त्याची जवळीक होती. तत्कालीन पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय म्हणूनही तो काम पाहत होता. नाशिक येथे झालेल्या महाआरोग्य शिबीरावेळीही त्याने महत्वपूर्ण जबाबदारी पेलली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजस्थान रॉयल्स जोस बटलरसोबत 4 वर्षांचा करार करणार, लाखो पौंड खर्च करणार