Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदारकीशी घेणं नाही; पवारांनी शेतकरी, पूरग्रस्तांबाबत बोलायचं होतं-राजू शेट्टी

Not to be taken lightly; Pawar wanted to talk about farmers
, रविवार, 5 सप्टेंबर 2021 (10:15 IST)
राजू शेट्टींच्या मुद्द्यावर शरद पवार बोलताच काही वेळातच राजू शेट्टी यांचीही प्रतिक्रिया आली. आमदारकीच्या विषयापेक्षा शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलले असते तर मला अधिक आनंद झाला असता, अशा शब्दांत शेट्टी यांनी पवारांवर टीका केली.
 
मला आमदारकीबाबत बोलायचंच नाही. या बातम्या नेमक्या कशा समोर आल्या? त्या कुणी आणि कशासाठी पेरल्या याचीही माहिती असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.
 
पण पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारनं पूरग्रस्तांकडं दुर्लक्ष केलं आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे होऊन दोन आठवडे झाले तरीही अद्याप निर्णय झालेला नाही. पवारांनी त्यावर बोलायला हवं होतं, असं शेट्टी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांची भाजप नेत्यांवर टीका