Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'या' वन्यप्राण्याची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उघड, एकाला अटक

One of them was arrested for hunting wild animals and roasting them 'या'  वन्यप्राण्याची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उघड
, शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (15:30 IST)
अहमदनगर पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस या वन्यप्राण्याची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उडकीस आला आहे. या प्रकरणी सुरेश दत्तू शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली. त्याचा साथीदारास मात्र फरार झाला असल्याचे समजते. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त केले.
 
सदर आरोपीला पारनेर न्यायालयाने सहा दिवस वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कान्हूर पठार येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्राजवळ असणाऱ्या वैदू वस्तीवर तरस जातीचा प्राणी भाजण्यात आला असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर भाळवणी परिक्षेत्राचे सी. ए. रोडे व संदीप भोसले यांनी कर्मचाऱ्यांसह छापा टाकला. त्यांना त्या ठिकाणी तरस या वन्य जीवाचे जळालेले शरीर व कातडी आढळून आली. त्याचा साथीदारास मात्र फरार झाला असल्याचे समजते. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त केले. आरोपीला पारनेर न्यायालयाने सहा दिवस वन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पब्लिक सब जानती है असे म्हणत भुजबळ यांचा राणेंना टोला