सध्या देशभरात मुस्लिम संघटनांकडून आय लव्ह मुहम्मद मोहीम आयोजित केली जात आहे. बीड येथे "आय लव्ह मुहम्मद" कार्यक्रमादरम्यान, एका मौलवीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दफन करण्याची धमकी दिली.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आय लव्ह मोहम्मद हा कार्यक्रम बीडमध्ये सुरु असताना एका मौलवीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह आणि भडकाऊ भाषणे केली. मौलवीने थेट मंचावरूनच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उघडपणे धमकी दिली. योगी जर माजलगावला आले तर त्यांना तिथेच दफन करू. तसेच मौलवीने योगी यांच्यासाठी अपशब्द वापरले.
सदर घटना बीडच्या माजलगाव येथील आहे. जिथे मुस्लिम संघटनांने आय लव्ह मुहम्मद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
माजलगावमधील या कार्यक्रमादरम्यान मौलाना अशफाक निसार शेख यांनी मुख्यमंत्री योगी यांना थेट मंचावरूनच दफन करण्याची धमकी दिली.
मौलाना म्हणाले, "जर योगी येथे आले तर त्यांना येथेच दफन केले जाईल." या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. मौलानांचे म्हणणे ऐकताचतेथे उपस्थित असलेले लोक संतप्त झाले आणि तणाव वाढला. तथापि, माजलगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी अद्याप कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही.
मुख्यमंत्री योगी यांच्याविरुद्धच्या धमकीनंतर, या प्रकरणात पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सोशल मीडियावर व्हिडिओ वेगाने पसरत असतानाही,बीड पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
या घटनेमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील या धमकीमुळे केवळ राज्यातच नाही तर देशभरात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.