Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पारनेर हत्याकांड : वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल

Parner murder: Rape case filed on complaint lodged by father Maharashtra News Regional Marathi News
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:14 IST)
पारनेर तालुक्यातील जवळा येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून पारनेर पोलीस ठाण्यामध्ये हत्या आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास ही मुलगी राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. यावेळी अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आणि त्यानंतर संपूर्ण पारनेर तालुक्यात खळबळ उडाली.
याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात केल्यानंतर मुलींचा मृतदेह आज सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणात असलेले आरोपी यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आ.निलेश लंके दुपारपासून जवळा गावात उपस्थित होते.त्यांनी पीडित कुटुंबियांना आधार देत न्याय मिळे पर्यंत आपण शांत बसणार नाही असे सांगितले. दरम्यान पोलिसांनी प्राथमिक अहवालानुसार मुलीचा मृत्यू हा गुदमरुन झाला असल्याचे सांगण्यात आलेले आहे.मात्र त्याच बरोबर इतर अनेक बाबी बाबत अहवाल नाशिक येथून यामधून आल्यानंतर अनेक बाबी समोर येणार आहेत.यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस ठाण्यामध्ये आज सायंकाळी हत्या आणि अत्याचार याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याबाबत पोलीस पुढील तपास करत आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता नाशिक येथून येणाऱ्या हवाला बाबत मोठी उत्सुकता असून तो अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील तपास निश्चित करणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोविड-१९ आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान