Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Result Declared पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर

Webdunia
गुरूवार, 20 जुलै 2023 (07:34 IST)
Police Sub Inspector Exam Result Declared : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ११ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक २५ सप्टेंबर २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण ६५० पदांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या ६५ पदांचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राखीव ठेवून उर्वरित ५८३ पदांचा अंतिम निकाल आज  जाहीर करण्यात आला आहे.
 
परीक्षेच्या जाहिरातीत अनाथ प्रवर्गासाठी ०६ पदे राखीव होती. तथापि, अंतिम निकालात केवळ ०४ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले असल्यामुळे अनाथ प्रवर्गाची ०२ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
 
या परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालानुसार वाशिम जिल्ह्यातील श्री. खचकड सुनिल भगवान,  हे राज्यातून तसेच मागासवर्गातून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्हयातील श्रीमती बिडगर सुरेखा रमेश,  ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत.
 
आयोगाच्या संकेतस्थळावर कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या ५८३ उमेदवारांचा गुणवत्ताक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ६५ पदांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम करण्यात येईल.
 
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: वनजमीन वाटप प्रकरणी नारायण राणेंना सीजेआई भूषण गवईचा मोठा धक्का

वनजमीन वाटप प्रकरणी नारायण राणेंना सीजेआई भूषण गवईचा मोठा धक्का, दिले हे आदेश

मराठा आरक्षणाविरुद्धच्या याचिकांवर सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन, मुंबई उच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांची नियुक्ती केली

नीरज आज दोहा डायमंड लीगमध्ये दाखवणार आपले कौशल्य,भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक जाणून घ्या

तुळजापूर मंदिर ट्रस्टने 12 पुजाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments