Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रदीप शर्मा : 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट', राजकारणी ते जन्मठेप असा आहे प्रवास

Webdunia
बुधवार, 20 मार्च 2024 (10:51 IST)
चकमकफेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या बनावट चकमकीप्रकरणी त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे.
येत्या तीन आठवड्यांत जेलमध्ये हजर होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शर्मा हे राजकारणात सक्रिय होऊ पाहात होते. पण कोर्टानं त्यांना चांगलाच दणका दिला आहे.
 
कोण आहेत प्रदीप शर्मा?
निवृत्ती घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. पालघरमध्ये नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.
शर्मा कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. मात्र, प्रदीप शर्माचे वडील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थलांतरित झाले. तिथेच ते स्थायिकही झाले. ते पेशानं शिक्षक होते.
प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशातील असला, तरी ते लहानपणापासूनच महाराष्ट्रात राहिले आहेत. लहानपणीच वडिलांसोबत ते धुळ्यात राहिले आणि प्राथमिक शिक्षणापासून ते एमएस्सीपर्यंत ते धुळ्यातच वाढले. शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी करून ते पोलीस सेवेत दाखल झाले.
 
पोलीस सेवेच्या आकर्षणाबद्दल सांगताना ते म्हणतात, "धुळ्यात असताना आमच्या शेजारी पगार नावाचे इन्स्पेक्टर राहायचे. लहान असताना त्यांना पाहायचो. ते युनिफॉर्मवर बाईकवर जात असत. पोलीस सेवेच्या आकर्षणासाठी ते एक कारणीभूत ठरलं म्हणता येईल."
 
महाराष्ट्रातली 1983 ची पोलिसांची बॅच सर्वांत प्रसिद्ध ठरली. या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, अस्लम मोमीन असे 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' म्हणून सर्वत्र परिचित असलेले पोलीस अधिकारी होते. याच बॅचमध्येच प्रदीप शर्मा हे सुद्धा आहेत.
 
नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ही बॅच 1984 साली पोलीस सेवेत कार्यरत झाली. प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. त्यानंतर ते स्पेशल ब्रँचमध्ये गेले. नंतर मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
 
'विजय साळकरांशी खबऱ्यांवरून वाद?'
26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या विजय साळसकरांशी प्रदीप शर्मा यांचा वाद होता, अशी बरीच चर्चा माध्यमांमधून झाली.
 
प्रदीप शर्मा यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत आपली बाजू मांडली होती.शर्मा यांनी म्हटलं, "शहीद विजय साळसकर हे माझे जिवलग मित्र होते. 1983 मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही एकाच स्कॉडला होतो. प्रशिक्षणात आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून स्कॉड तयार केले जातात. त्यांचं साळसकर आणि माझं शर्मा आडनाव, त्यामुळं आम्ही एकाच स्कॉडला होतो. वर्षभर आम्ही एकत्र राहिलो. मुंबईत आल्यानंतरही बरीच वर्षे एकत्र होत. क्राईम ब्रांचलाही आम्ही एकत्र काम केलंय. काही मोठमोठे ऑपरेशनही आम्ही एकत्र केलेत."
 
"विजय साळसकरांसोबत केलेली कामं आजही आठवतात. सगळ्यांत जास्त इन्फर्मेशन नेटवर्क असणारा अधिकारी म्हणून आजही विजय साळसकरांना मी मानतो. माझ्यापेक्षा शंभर पटीनं जास्त नेटवर्क त्यांचं होतं," असं शर्मा सांगतात.
 
"साळसकर आणि माझ्यात जमत नाही, हे माध्यमांनी जे पसरवलं होतं, तसं खरंतर काहीच नव्हतं. आमची भांडणं फक्त खबऱ्यांवरून व्हायची. त्याचा खबरी असेल, तर मी त्याला ट्रॅप करायचो, माझ्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचो. माझे खबरी तो वळवायचा. अबोला असं काही नव्हतं," असंही प्रदीप शर्मा म्हणाले.
 
2009 साली रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एकूण 13 पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चार वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर 2013 साली प्रदीप शर्मांची सुटका झाली होती.
आता पुन्हा या प्रकरणी त्यांना जन्मठेप झाली आहे.
 
अंबानी प्रकरण
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया बाहेर बॉम्ब ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातदेखील प्रदीप शर्मा यांचं नाव आलंय.
या प्रकरणी एनआयएनं त्यांना अटकही केली होती.
25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही अँटिलया परिसरात सापडली होती. या गाडीचे मालक आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी ठाण्याजवळच्या खाडीत आढळला होता.मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी सहकारी सचिन वाझेला मदत केल्याचा शर्मा यांच्यावर आरोप आहे.

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

दक्षिण कोरियाने स्पर्धा दिली पण शेवटच्या मिनिटांत भारताने हा सामना 3-2 असा जिंकला

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi पाकिस्तानची भाषा बोलत आहे काँग्रेस, पंतप्रधान मोदी पुण्यात म्हणाले

शांततेच्या नोबेल पुरस्काराचे पात्र पंतप्रधान मोदी, मार्क मोबियस यांचा मोठा दावा

खाटूश्याम मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविक जखमी

पुढील लेख
Show comments