Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पिंपरी मनपाच्या स्थायीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांचा ‘या’ अटींवर जामीन मंजूर

पिंपरी मनपाच्या स्थायीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांचा ‘या’ अटींवर जामीन मंजूर
, सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:07 IST)
होर्डिंगच्या टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी दहा लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. काही अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
अ‍ॅड. नितीन लांडगे (50, रा. भोसरी) त्यांचे पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (56, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (50, रा. भीमनगर, पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (51, रा. वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (38, रा. धर्मराजनगर) यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्‍या सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान हजेरी, फिर्यादी आणि गुन्हयाशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येण्याच्या अटीवर तसेच प्रत्येकी 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्याकडून अ‍ॅड. प्रताप परदेशी  आणि अ‍ॅड. गोरक्षनाथ काळे  यांनी तर उर्वरीत आरोपींतर्फे अ‍ॅड. विपुल दुशिंग, अ‍ॅड. कीर्ती गुजर , अ‍ॅड. संजय दळवी  यांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्यांसाठी जामीन अर्ज दाखल केला होता.
 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अ‍ॅन्टी करप्शनची रेड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनकडून पिंपरी-चिंचवड मनपाच्या 16 स्थायी समितीच्या सदस्यांकडे चौकशी करण्यात येणार असल्याचं यापुर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे.आरोपींच्या वतीने जामीन अर्ज दाखल केल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनकडून जामीनास तीव्र विरोध करण्यात आला होता.अखेर न्यायालयाने काही अटींवर अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांचा जामीन मंजूर केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’, कोंढव्यात गुन्हा दाखल