Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ करणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं

Webdunia
गुरूवार, 4 मे 2023 (07:33 IST)
व्हिडीओबाबत गौतमी पाटील हिने पोलिसांत तक्रार केली होती. आता पोलिसांना यात मोठं यश आलं आहे. गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ करणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या मुलाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे. गौतमीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अनेक मंडळी तिच्या पाठिशी उभे राहिले. राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
 
नेमकं प्रकरण काय?
गौतमी पाटीलचा 24 फेब्रुवारीला पुण्यात कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील केला. त्यानंतर गौतमी पाटीलसोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मागच्या काही दिवसांपासून पोलीस या प्रकरणी तपास करत होते.

अशा घटना वारंवार घडू नये. सोबतच्या इतर कोणत्याही कालाकाराबाबत असा प्रकार घडू नये म्हणून गौतमीने व्हॅनिटी व्हॅन वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हॅनिटी व्ह‌‌‌‌ॅनमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतात. शिवाय कलाकारांसाठी ही व्ह‌ॅन अत्यंत सुरक्षित असते. मराठी सिनेसृष्टीपासून ते बाॅलिवूडपर्यंतचे कलाकार या व्ह‌‌ॅनिटी व्ह‌‌ॅनचा वापर करतात. जिथे जिथे ती कार्यक्रमाला जाते तिथे ती व्ह‌ॅनिटी व्हॅनची मागणी करते. तसंच संरक्षणासाठी तिने बाऊन्सरही ठेवले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments