Marathi Biodata Maker

पुढील दोन दिवसात कोकणात पाऊस हजेरी लावणार

Webdunia
गुरूवार, 2 जून 2022 (15:03 IST)
लवकरच मुंबईत पाऊस  हजेरी लावणार आहे. पुढील दोन दिवसात पाऊस महाराष्ट्राच्या कोकण परिसरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या केरळमध्ये असलेले पाऊस हा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. मात्र, मुंबईकरांना पावसासाठी आणखी आठवडाभर प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यानुसार मुंबईत मान्सून  १० जूननंतर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
 
भारतीय हवामान विभागाने 29 मे रोजी जाहीर केले होते की, नैऋत्य मान्सून 1 जून रोजी नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहोचला आहे. दरम्यान, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे.
 
“नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आहे. कर्नाटकचा आणखी काही भाग, कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, प.म. बंगालचा उपसागर, ई. बंगालचा उपसागर, ईशान्येमधील राज्ये, सिक्कीममध्ये पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे”, असे के. एस. होसाळीकर यांनी लिहिले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

नवीन

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, बच्चू कडू यांचा दावा

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पदभार स्वीकारावा,महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर बच्चू कडू यांचे वक्तव्य

ज्येष्ठ गायिका एस. जानकी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

LIVE: एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, बच्चू कडू यांचा दावा

पुढील लेख
Show comments