Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा फोटो चर्चेत

raj thackeray
, सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (08:38 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा शिवाजी पार्क जिमखाना इथे एकत्र टेनिस खेळतानाचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याआधी देखील राज ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा फोटो समोर आला होता. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर तो पोस्ट करण्यात आला होता. 
 
राज ठाकरेंचं टेनिस प्रेम यामुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे हे क्रिकेट खेळत असे. पण एकदा पायाला जोरात बॉल लागल्यामुळे त्यांनी क्रिकेट खेळणं सोडलं. यामागे ज्येष्ठ राजकीय पत्रकार धवल कुलकर्णी यांच्या 'ठाकरे कझिन्स' पुस्तकात त्याबाबत उल्लेख देखील आहे. बॉल लागल्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंना म्हणाले होते की, 'आज तुझ्या पायावर बॉल लागून पाय सुजला आहे. उद्याहातावर बॉल लागला आणि हात सुजला तर व्यंगिचत्रिकार होण्याचं स्वप्नाचं काय?' यानंतरच राज ठाकरे यांनी क्रिकेट खेळणं सोडल्याचं बोललं जातं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यूपी: बहराइचमध्ये भीषण रस्ता अपघात, दोन वाहनांच्या धडकेत 6 ठार, 10 जखमी