Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृष्णकुंजच्या बाहेर दोन्ही रस्त्यांवर हॉकर्स झोन

raj thakare
, बुधवार, 17 जानेवारी 2018 (10:51 IST)

मुंबईतील धोरणानुसार राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज घरासमोरचा आणि मागचा अशा दोन्ही रस्त्यांवर हॉकर्स झोन तयार करण्यात आलाय. दादरमधल्या एम. बी राऊत मार्ग आणि केळूसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी १० अशा एकूण  २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आलीय. सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नसतांना येथे हॉकर्स झोन तयार करण्याची गरजच काय, असा प्रश्न विचारला जातोय. तसंच या परिसरात शाळा असल्यानं हॉकर्स झोन तयार करण्याच्या नियमावलीचंही उल्लंघन करण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

याआधी राज ठाकरेंनी एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधी मोहीम सुरू करत फेरीवाल्यांना सळो की पळो करुन सोडलं. आता महानगरपालिकेनंच राज ठाकरेंच्या घराबाहेर मुद्दाम फेरीवाल्यांना जागा करुन दिल्याचं बोललं जातंय. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खुशखबर : मुंबई पोलिसांची ड्युटी आता फक्त ८ तास