Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन् बाकीचे मंत्री फक्त बारशासाठीच, अमोल मिटकरींची जहरी टिका

Webdunia
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (15:06 IST)
आताचे सरकार हे देवेंद्र फडणवीस चालवतात. राज्यातील सर्व निर्णय तेच घेतात आणि बाकीचे मंत्री वाढदिवस आणि बारसे साजरे करण्यासाठी राज्याच्या दौऱयावर असतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील देवेंद्र फडणवीसांचे ऐकतात. बाळासाहेबांची शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाही. आरएसएसचे बाळासाहेब देवरस यांचे नाव आहे असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले. तसेच यापुढे क्रिमिनल आणि लबाड लोकांना निवडून देऊ नका. शेतकऱयांच्या प्रश्नासाठी झगडणाऱया लोकांना विधानसभेत पाठवा, असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले.
 
गोंदवले बुः (ता. माण) येथील आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित माजी कोकण कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, बांधकाम सभापती महेशराव जाधव, मनोज पोळ, श्रीराम पाटील, आ. दीपक चव्हाण, सुनील पोळ, बाळासाहेब सावंत, सौ. मंदाकिनी सावंत, सुभाष नरळे, जयप्रकाश कट्टे, सुरेंद्र मोरे, दिलीप तुपे इत्यादी उपस्थित होते.
 
 आ. अमोल मिटकरी म्हणाले की, आम्ही मंत्रालयात गेल्यानंतर आम्हाला फक्त फडणवीस दिसतात. कारण तेच सर्व निर्णय घेतात. बाकीचे मंत्री दौऱयावर असतात. अशी भयानक परिस्थिती आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

LIVE: रत्नागिरीत कार नदीत कोसळल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments