Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा अतिवृष्टीचा पुणे वेधशाळेचा इशारा

pune news
पुढील तीन दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. मुंबईसह कोकण, गोवा आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाट आणि धरण परिसरात जाणं टाळावं असं आवाहन पुणे वेधशाळेनं केलं आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ अनुपम काश्यपी यांनी सांगितलं आहे.
 
कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूरात आतापर्यंत सरासरीपेक्षा ५६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. सांगलीमध्ये ४७ टक्के, तर साताऱ्यामध्ये ६६ टक्के जास्त पाऊस झालाय. यंदा पुणे जिल्ह्यातली पावसानं कहर केला आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल १३४ टक्के जास्त पाऊस आतापर्यंत पडला आहे. नाशिकलाही यंदा पावसानं झोडपलं असून सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. मुंबईतही २९ टक्के जास्त पाऊस पडला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापूर, सांगलीतल्या पावसाचा मुंबईला फटका, दूध पुरवठा बंद