Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rohit Pawar : भर पावसात रोहित पवारांचं आंदोलन

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2023 (14:35 IST)
social media
सध्या राज्य विधिमंडळासह पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवन परिसरात शिवरायांच्या पुतळ्याजवळ एकटेच आंदोलनाला बसले आहे. कर्जतच्या जामखेड मतदार संघातील एमआयडीसी या मुद्द्यावरून हे आंदोलन केल्याचे म्हटले जात आहे. अधिवेशनात या मुद्द्याकडे सर्वांचं लक्ष जावे या साठी हे आंदोलन करण्यात आले आहे. ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी .या साठी हे आंदोलन सुरु आहे. 
<

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच कर्जत जामखेडच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी स्थानिक आ. रोहित पवार यांच्याकडून आज विधानसभेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून भर पावसात… pic.twitter.com/nNPZnFsVau

— NCP (@NCPspeaks) July 24, 2023 >
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांची भेट घेउन हा मुद्दा समजून घेतला. रोहित पवारांनी त्यांचं प्रश्न आणि मुद्दा सभागृहात येऊन मांडण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला. 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांचं या असं आंदोलन करण्याला अयोग्य म्हटले आहे. मात्र सभागृहात या मुद्द्यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रवाचन केलं. आमदार रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्याचा काय निर्णय घेतला जातो हे पाहावे लागणार. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments