रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, मात्र त्यांच्यामुळे महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. संगीता चव्हाण या बीडमधील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी देखील आहेत.
संगीता चव्हाण म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळाला होता. मात्र आता रुपाली चाकणकर या फक्त आपल्या पक्षाचे काम करत आहेत. त्यामुळे महिलांना न्याय मिळत नाही, असा आरोप करतानाच संगीता चव्हाण यांनी गडचिरोलीमधील वन विभागातील एका प्रकरणात संबंधित महिलेला महिला आयोगाच्या कार्यालयातून हाकलून लावण्यात आल्याचे सांगितले. तसेच संबंधित महिलेने आतापर्यंत महिला आयोगाकडे न्याय मागण्यासाठी किती वेळा अर्ज आणि विनवणी केली, याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत.
Edited by: Ratnadeep Ranshoor