सातारा जिल्ह्यात तालुका कोरेगावातील हिवरे येथे माली नालाबांधामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. वेदांत रोहिदास गुजले वय वर्ष 12 व ऋतुराज रोहिदास गुजले वय वर्ष 14 असर मयत मुलांची नावे आहेत.
काल शाळेला सुट्टी असल्याने मुलांची आई सुवर्णा रोहिदास गुंजले मुलांना घेऊन शेतात गेल्या त्या खुरपणीचा कामात व्यस्त होत्या. दुपारी आईने दोघांना जेवायला बोलावले नंतर ते जनावरे चारण्यासाठी शिवारात गेले. दरम्यान ते दोघे शेतात जवळच नाईक इनामदारांच्या शिवारातील माती नालाबांधात पोहण्यासाठी गेले. ऋतुराज याला पोहता येत होते, पण वेदांतला पोहता येत नव्हते.
ते पाण्यात उतरले आणि परत वर आलेच नाही. संध्याकाळी आई त्यांना शोधत माती नालाबांधाजवळ गेली असता तिला त्यांचे कपडे सापडले मात्र ते दोघे कुठेच सापडले नाही. त्यांनी ही माहिती आपल्या पतीला दिली. मुलांची शोधाशोध होऊ लागली. गावातील तरुण देखील मुलांच्या शोधकामाला लागले.
रात्री 7:30 च्या सुमारास दोघांचे मृतदेह आढळले. या घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. मुलांचे मृतदेह पाहून मुलांचा आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.