Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

15 जुलै पासून शाळा सुरू होणार!

15 जुलै पासून शाळा सुरू होणार!
, बुधवार, 7 जुलै 2021 (19:39 IST)
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून कोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२ वीचे वर्ग येत्या १५ जुलै २०२१पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 
 
राज्य सरकारने याआधी देखील कोरोनोमुक्त ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्याच दिवसी त्या निर्णयला शासनाकडून स्थगिती देण्यात आली. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शिक्षक विभागाची घाई गडबड केल्याचे दिसून आल्याने शासनाने या निर्णयास स्थगिती दिली होती. मात्र आज पुन्हा नव्याने कोरोनामुक्त क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय देत शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
 
राज्यातील कोविड मुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय आज शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.  विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. 
 
राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ज्या गावात आठवी ते बारावी  वर्ग सुरू करायचे आहेत त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा. शिवाय,ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. 
 
सोबतच, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून आज पुन्हा नव्याने आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावी. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे अशी सूचना दिल्या आहेत . 
 
एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे. 
 
ग्रामीण भागात ८वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यांचे पालन करणे गरजेचे आहे. काय आहेत त्या सूचना जाणून घ्या.
ग्रामीण भागात ८वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामसेवक,मुख्यध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची समिती गठीत करून शाळा सुरु होण्यासाठी चर्चा करावी .
शाळेत कोणी कोरोनाग्रस्त आढळल्यास शाळा तात्काळ बंद करावी.
टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करावी. अदला बदलीच्या दिवशी महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्यावे.
शिक्षकांच्या राहण्याची सोय गावातच करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय टाळावा.
वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा. दोन बाकांमध्ये ६ फूटांचे अंतर ठेवावे. एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत.
शाळा सुरु होण्यापूर्वी 'चला मुलांनो शाळेत चला' अशी मोहिम शाळेने राबवावी.
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
शाळेत कोरोना सेंटर असल्यास ते एक तिथून दुसऱ्या ठिकाणी हलवावे आणि शाळेचे त्वरित निर्जुंकिकरण करावे.
शाळेत विलगीवकरण केंद्र असेल्यास तिथे शाळा भरवणे शक्य नसल्याचे खुल्या परिसरात शाळा भरवावी.
शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करणे अनिवार्य.
सतत हात साबणाने हात धुणे, मास्कचा वापर,सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे विद्यार्थी तसेच शिक्षकांना अनिवार्य आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू होणार!