Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लांडग्यांनी वाघाचं कातडं पांघरल म्हणजे लांडगा वाघ होत नाही

eknath shinde
, गुरूवार, 25 जानेवारी 2024 (09:05 IST)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावातील उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा लुक संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, लांडग्यांनी वाघाचं कातडं पांघरल म्हणजे लांडगा वाघ होत नाही. यासाठी वाघाचं काळीज लागतं. खरं तर वाघ एकच आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. माझी शिवसेना काँग्रेस होईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन म्हणणाऱ्या बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वार्थासाठी त्यागले आहेत. त्यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसले आहे. त्यामुळे मिंधेपणा कोणी केला याचा विचार जनतेने केला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
 
उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांसारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येत नाही. त्यासाठी बाळासाहेबांचे विचार असावे लागतात आणि ते विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मोदींना साष्टांग दंडवत घालायला पाहिजे होतं, पण ते काँग्रेसला घालायला लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच मी काल पण हेच बोललो आहे की, पब्लिक सब जानती है! काल त्यांनी माझ्यावर टीका केली, मोदींवर टीका केली. पण त्यांना आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार आहे? ज्या मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग राहणार बंद, एपीएमसी मार्केट दोन दिवस राहणार बंद