Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

Shinde welcomes Supreme Court decision
सोलापूर , बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (13:13 IST)
महाविकास आघाडीची सत्ता 5 वर्षे राहील
राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केली असून आता या तीनही पक्षात कायम एकी राहील. पूर्ण पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असेल, असे मत देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
 
पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, भारत हा लोकशाहीसमृद्ध देश आहे. या देशामध्ये कोणाची हुकूमशाही चालणार नाही. आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तेसंदर्भात निर्णय देऊन हे सिद्ध केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे आदरपूर्वक स्वागत करतो. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी महाविकास आघाडीत कायम एकी राहील. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे. धर्मनिरपेक्ष संदर्भात शिवसेनेनेही आपली काही तत्त्वे बाजूला ठेवली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पाच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता कायम राहणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे भारतीय घटनेवर हात ठेवून शपथ घेण्यासंदर्भात सांगत होते. भारतीय संविधान व घटना फार महान आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Paytm वरून UPI खाते असे करा डिलीट, काळजी करण्याची गरज नाही